कधी कधी असं वाटतं की जीवनात काहीही होत नाही, आपण हरवलो आहोत, आणि अशा वेळी तुम्ही स्वतःला शोधण्याचा प्रयत्न सुरु करता. जेव्हा प्रयत्न सुरु करता तेव्हा जाणवते की, आयुष्याचा प्रवास अजून सुरु आहे. आपला प्रवास संपलेला नाही आणि आपले गंतव्य स्थानही अजून आलेले नाही. आणि तुम्ही आणखी जोमाने कामाला सुरुवात करता. अगदी हाच विचार करून अनुपम खेर यांच्या शिवशास्त्री बल्बोआ चित्रपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे.
शिवशास्त्री बल्बोआ (अनुपम खेर) मैत्रिण एल्सा (नीना गुप्ता) ला मदत करण्यासाठी निघाले आहेत, आपल्या मुलाच्या राहुलच्या (जुगल हंसराज)च्या आरामदायी घरातून त्यांचा हा प्रवास एका वेगळ्या साहसाच्या जगात प्रवेश करतो.
त्यांच्या या रोलरकोस्टर राईडमध्ये त्यांना साथ मिळते सिनॉमन सिंग (शरीब हाश्मी) आणि त्याची प्रेमळ मैत्रीण सिया (नर्गिस फाखरी) यांची. त्त्यानंतर प्रवेश होतो बाईकर्सच्या टोळीचा. या बायकर्स टोळीसोबत अनुपम खेर जीवनाच्या एका अनोख्या साहसी प्रवासाला सुरुवात करतात. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या मुलाचा कुत्रा कॅस्पर उर्फ कॅप्सूल त्यांना प्रोत्साहित करतो, त्यांना साहसी कृत्ये करण्यास प्रेरित करतो. त्यामुळे शिवशास्त्री बल्बोआचे आयुष्य ऊर्जा आणि उत्साहाने भरले जाते.
शिवशास्त्री बल्बोआचा ट्रेलर नुकताच पीव्हीआर आयकॉन येथे लाँच करण्यात आला. यावेळी सुपरबायकर्सची टोळीही उपस्थित होती. आणि यावेळी अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांनी पिलियन राइडचा आनंद घेतला! याला तुम्ही साहस म्हणणार नाही तर काय?
एका सामान्य माणसाच्या असामान्य साहसांमध्ये शिवशास्त्री बल्बोआसमवेत सामील व्हा आणि घ्या सुपरबाईक चालवण्याचा आणि स्कायडायव्हिंगचा अनुभव!!!
अजयन वेणुगोपालन दिग्दर्शित शिवशास्त्री बल्बोआत अनुपम खेर, नीना गुप्ता, जुगल हंसराज, नर्गिस फाखरी आणि शारीब हाश्मी यांच्या अत्यंत महत्वपूर्ण भूमिका आहेत. यूएफआय मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड, किशोर वरिएथ, अनुपम खेर स्टुडिओ आणि तरुण राठी प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता आहेत- किशोर वरिएथ, कार्यकारी निर्माते आहेत- आशुतोष बावजपेयी. शिवशास्त्री बाल्बोआ 10 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. एका वेगळ्या प्रवासाचा आनंद घ्यायला विसरू नका.


स्कायडायव्हिंग आणि सुपरबाइक चालवण्यास प्रवृत्त करणारा अनुपम खेरचा ‘शिवशास्त्री बल्बोआ’चा ट्रेलर 10 फेब्रुवारीला चित्रपट होणार प्रदर्शित
More Stories
Indian Bangla Club Presents Andheri Link Road Sarbojanik Durga Puja 2025
Birthday Special – BJP Leader Gyan Prakash Singh Celebrates His Birthday With A Pledge For Social Service
S K Singh Rajput An Outstanding Actor With Rare Acting Calibre